Sanjay Raut | “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”

Sanjay Raut | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला. यावरुन शिवसेनेचा ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता एका म्हणीचा आधार घेत बोचरी टीका केली आहे.

“पाळीव कुत्र्याने टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही”

“समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut criticize on Eknath Shinde group

“सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचं पाहिलं. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का?”, असा सवालही यावेळी संजय राऊतांनी केला आहे.

“रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार”

“पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. शिवसेना ही शिवसेना आहे. त्यांनी कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे,” असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

“आता आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली”

“या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष 50 वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-