Prakash Ambedkar | निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे जाणार न्यायालयात; प्रकाश आंबेडकर म्हणाले…

Prakash Ambedkar | मुंबई : राज्यात शुक्रवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायलयामध्ये जाणार असल्याचे काल पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. यावरुन ठाकरे गटाशी युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी निवडणूक आयोगाचा निकाल तसेच ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

“निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी या आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची गरज आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“लोकशाहीच्या दृष्टीने घातक, लोकशाहीला श्रद्धांजली वाहून देशात बेबंदशाही सुरू असल्याचे सांगा. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. न्यायालयात लढाई सुरू असताना आयोगाने निर्णय देवू नये, मात्र आता धनुष्यबाण चोरलेला आहे. हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे”

या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आम्ही सर्वेोच्च न्यायालयात याला आव्हान देवू. धनुष्यबाण तुम्ही घेऊ शकणार नाही. तु्म्ही धनुष्यबाण काही काळ चोरू शकता. धनुष्यबाण चोरल्याचा आनंद त्यांना घेऊ द्या. शिवसैनिकांनो कुठेही खचू नका, मी खचलेलेन नाही.. शिवसेनाचा विजय हेईल, आता विजयाशिवाय माघार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं”

“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्यांच्या ताब्यात जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती जागा शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना पक्ष आमचाच आहे. खुर्चीवर बसलेल्या काही लोकांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेची शाखा, शिवसेनेची संपत्ती आणि हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहतील”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली

“या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष 50 वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर ही लढाई अद्याप संपली नसल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळे आगामी महापालिका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणत्या बाजूने जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button