Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Nose Redness | टीम कृषीनामा: त्वचेच्या संसर्गामुळे नाकाच्या सभोवतालची त्वचा लाल व्हायला लागते. त्याचबरोबर सर्दी झाल्यावर नाक पुसून-पुसून नाकाभोवती लालसरपणा येऊ लागतो. तर रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ निर्माण झाल्यामुळे नाकाभोवती लालसरपणा दिसायला लागू शकतो. नाकाच्या सभोवती लालसरपणा आल्यावर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्याचबरोबर ते त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल झाल्यावर लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण या समस्येवर उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल झाल्यावर तुम्ही पुढील उपाय करू शकतात.

मध (Honey-For Nose Redness)

नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल झाली असेल तर मध त्यावर एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कापसाच्या मदतीने मधाचा वापर करावा लागेल. लाल झालेल्या जागेवर तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा मध लावू शकतात. मधाचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे नाक आणि त्वचेवरील संसर्ग दूर होऊन लालसरपणा कमी होऊ शकतो. त्वचेवरील लालसरपणा कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

दही (Curd-For Nose Redness)

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळून येतात. प्रोबायोटिक्सच्या मदतीने त्वचेचा संसर्ग बरा होऊ शकतो. त्यामुळे त्वचा आणि नाकावरील लालसरपणा दूर करण्यासाठी दही प्रभावी ठरू शकते. यासाठी तुम्ही दह्यामध्ये मध मिसळून त्वचेवर लावू शकतात. त्याचबरोबर दह्याचे सेवन करूनही त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. ज्या लोकांना दह्याची एलर्जी आहे, ते यासाठी कच्च्या दुधाचा वापर करू शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Nose Redness)

त्वचा आणि नाकावरील लालसरपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. खोबरेल तेलामध्ये आढळणारे घटक संसर्गाशी लढण्यास मदत करतात. त्वचेवरील लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही थेट त्यावर खोबरेल तेल लावू शकतात. तुम्ही दिवसातून तीन वेळा खोबरेल तेल लाल त्वचेवर लावू शकतात. नियमित खोबरेल तेल वापरल्याने लालसरपणा लवकर दूर होऊ शकतो.

कोरफड (Aloevera-For Nose Redness)

कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला संसर्गापासून दूर ठेवू शकतात. त्वचा आणि नाकाभोवतीचा लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या गराचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला किमान पंधरा मिनिटे कोरफडीचा गर त्वचेवर लावून ठेवावा लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित याचा वापर केल्याने त्वचेवरील लालसरपणा कमी होऊ शकतो.

त्वचा आणि नाकावरील लालसरपणा कमी करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती पद्धती वापरू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावर चमक वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

बटाट्याचा रस आणि टोमॅटो (Potato juice and tomatoes-For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसामध्ये टोमॅटोचा पल्प मिसळू शकतात. बटाट्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला बटाट्याच्या रसामध्ये टोमॅटोचा पल्प मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा आठवड्यातून तीन वेळा वापर करू शकतात.

बटाट्याचा रस आणि हळद (Potato juice and turmeric-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसात हळद मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला बटाट्याच्या दोन चमचे रसामध्ये चिमूटभर हळद मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग दूर होऊ शकते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि चमकदार होते.

महत्वाच्या बातम्या

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Mahashivratri Diet | शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन