Shivsena | पुण्यात शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा; पोलिसांकडून कारवाई

Shivsena | पुणे : राज्याच्या राजकारणात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)  शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये शिवसेना अधिकृतपणे विभागली गेली आहे. त्यावरुन पुण्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे-ठाकरे गटाचा वाद हा गेल्या आठ महिन्यांपासून सुरु आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, असं वेळोवेळी त्यांच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि ठाकरे विरुद्ध शिंदे गट आमने सामने आले आहेत. पुण्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात ठाकरे-शिंदे गट आमने-सामने

पुण्यात पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. काही वेळानंतर हा वाद निवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

“गद्दारांना गाडून शिवसेना वाढवा, कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे. या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“तुम्ही चिडलेला आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर हा आघत कोसळला नसेल. भाजप नेते आणि पंतप्रधानां वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-