Sharad Pawar | “राज्यात गद्दारीची बीजे शरद पवारांनीच रोवलीत”; सेना खासदारांची जहरी टीका

Sharad Pawar | मुंबई : राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)  शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये विभागली गेली आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणून टीका करण्यात आली. यावरुन आता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

प्रतावराव जाधवांची शरद पवारांवर टीका

“राष्ट्रवादीचे नेते आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीची बीजे शरद पवारांनीच रोवली. उद्धव ठाकरेंना हेच पवार आपले तारणहार वाटायचे. ते जादूची कांडी हातात घेऊन आपल्या सर्व समस्या सोडवतील अशा गैरसमजातच ते अडीच वर्षे वावरले” अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

“महाराष्ट्रात गद्दारीची बीजे शरद पवारांनी रोवली” (Prataprao Jadhav criticize Sharad Pawar)

“राष्ट्रवादीचे अजित पवार, अन्य नेते ते आजचे राजकारणी असलेले रोहित पवार आमच्यावर गद्दार असल्याची टीका करतात. मात्र सभ्य राजकारणाचा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात गद्दारीची बीजे शरद पवारांनी रोवली हा इतिहास आहे. त्यांच्या शब्दांत गद्दारी आहे. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता”, असेही प्रतापराव जाधव यांनी टीका केली आहे.

“उद्धव ठाकरेंच्या डोक्यात ‘सीएम’ पदाची हवा होती” -Prataprao Jadhav

“2019मध्ये जिल्ह्यात आमचे दोन आमदार, दोन विधानपरिषद सदस्य आणि मी खासदार असताना सेनेचा पालकमंत्री नेमण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली. केवळ एकच आमदार, तोही जातीयवादामुळे निवडून आलेल्या राष्ट्रवादीला हे पद देण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात ‘सीएम’ पदाची हवा एवढी शिरलेली की, ते अडीच वर्षे घराबाहेर पडलेच नाही. यामुळे एकसंघ सेनेतील असंतोष वाढतच गेला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला उठाव, याचा परिणाम होय”, असा युक्तिवाद मांडत जाधव यांनी बंडखोरीचे समर्थन केले.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button