Share

Shivsena | आयोगाच्या निर्णयाला न्यालायल स्थगिती देईल का?; उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेचा खटला अद्यापही प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून जारी केलेला व्हीप ठाकरे गटातील आमदार पाळणार का? किंवा ठाकरे गटातील आमदारांनी शिंदे गटाचा व्हीप पाळला नाही, तर त्यांच्यावर कारवाई होईल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले आहे.

आयोगाच्या निर्णयाला न्यालायल स्थगिती देईल का?

“हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे युक्तिवाद करण्यात येतील. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल? हे सांगणं आज कठीण आहे. पण माझ्या मते या प्रकरणात कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे, त्याला न्यायालय स्थगिती देईल का? हे बघितलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय

निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिले. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now