Ajit Pawar | “मी नखाला नखं घासली, केसं यायची तर लांबच पण माझी केसं न् केसं गेली”

Ajit Pawar | अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. अजित पवारांनी एखादं वक्तव्य केलं की त्याची चर्चा तर होणारच. आपल्या सडेतोड वक्तव्याने प्रसिद्ध असणाऱ्या अजित पवारांनी आता एका सभेत आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता. अजित पवार जाहीर सभांमध्ये असे काही विनोदी, मिश्किल टिका, वक्तव्य करतात की, ज्यामुळे अनेकदा सभेत उपस्थित लोकांची हसून हसून पुरे वाट होते.

आज अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बुवाबाजीवर असेच एक बिनधास्त वक्तव्य केले आहे. लांब केस हे सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. अजित पवार यांनी अनेकदा स्वतःच्या केसांवर विनोद केलेला आहे. यावेळी त्यांनी रामदेव बाबांचे नाव घेत पुन्हा एकदा विनोद केला आहे.

“मी नखाला नखं घासली, केसं यायची तर लांबच पण माझी केसं न् केसं गेली” (Ajit Pawar comment on Ramdev Baba)

“तुम्ही नखाला नख कशाला घासता, ते रामदेव बाबाने सांगितले म्हणून करता. रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घास. मी तसंच केलं. मी नखाला नखं घासली, केसं यायची तर लांबच पण माझी केसं न् केसं गेली. नवीन केस यायचं तर नावाच नाही. या बुवा लोकांचं काही ऐकू नका. साधू संताचं ऐका, महापुरुषांचं ऐका” असा सल्ला अजित पवारांनी उपस्थितांना दिला आहे.

“नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचं” | Ajit Pawar Comment on Ramdev baba

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांनी सांगितलेले विचार ऐका. मौलाना आझाद असतील शाहू-फुले-आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महान लोकांचे ऐका. पण बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका. नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचं. डॉक्टरकडं जावं लागेल. डॉक्टर म्हणेल, हे कुणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल.”, अजित पवारांच्या या किस्स्याने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकल्याचं पहायला मिळालं.

रामदेव बाबांवर गुन्हा दाखल (A case has been filed against Ramdev Baba)

राजस्थान पोलिसांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात रविवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस स्थानकात एका स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदेव बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लिम धर्मीयांबद्दल केलेल्या वक्तव्याने रामदेव बाबा चांगलेच अडचणीत सापडले होते. या वक्तव्यावरुन भादंविच्या कलम 153 अ, 295 अ आणि 298 अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची समोर आले आहे.

Ajit Pawar told the story of Ramdev baba and the whole meeting burst into laughter Ahmednagar News

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.