Share

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar | औरंगाबाद : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भाजपच्या पाठिंब्यावर 6 महिन्यांपूर्वी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. परंतु अद्याप या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा … Read more

Published On: 

Ajit Pawar | औरंगाबाद : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भाजपच्या पाठिंब्यावर 6 महिन्यांपूर्वी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. परंतु अद्याप या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील एका भाषणावेळी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

“मंत्रिपदासाठी नवस केले, अभिषेक करत बसलेत”-(Ajit Pawar)

“सरकारने बऱ्याच जणांना मंत्रिपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्या सोबत घेतलं. त्यापैकी प्रत्येकाला मंत्रिपदाचं गाजर दाखवलं होतं. मंत्रिपदाच्या आशेने 40 बंडखोर आमदारांपैकी बऱ्याच जणांनी नवीन सूट शिवून घेतले. त्यांना आता त्यांची बायको विचारते या सूटची घडी कधी मोडणार? यांनी नवस केले, अभिषेक करत बसलेत. पण नवस फेडायला अजून मंत्रिपद काही मिळालेलं नाही. मंत्रिपद मिळाल्यावर नवस फेडायला येईन असं म्हणाले होते. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आणि यांना मंत्रिपद मिळालं नाही”, असे म्हणत अजित पवारांनी बंडखोर आमदार आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे.

“सरकार केवळ घटनाबाह्य नाही तर स्थगिती सरकार” (The government is not only unconstitutional but a suspended government)

“हे शिंदे-फडणवीस सरकार केवळ घटनाबाह्य नाही तर स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक प्रकल्पावर स्थगिती लावली जात आहे. आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या मतदार संघात आणलेल्या प्रकल्पांवर स्थगिती लावली आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“असे प्रकल्प राज्यात आणायला या सरकारमध्ये धमक नाही”

“माझ्या जिल्ह्यात येणारा 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातला नेला. या प्रकल्पाद्वारे 2 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. राज्यातले अनेक मोठमोठे प्रकल्प परराज्यात पळवले जात आहेत. घटनाबाह्य सरकार केवळ आश्वासन देतंय, की दुसरे मोठे प्रकल्प राज्यात येणार आहेत. परंतु तसं होईल असं दिसत नाही. कारण असे प्रकल्प राज्यात आणायला धमक लागते, जी या सरकारमध्ये नाही”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही