Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. असे राजकारणातले दोन अलिखित नियम आहेत.

मुक्ता टिळक यांच्या जागी भाजपने टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपने तिकिट दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते. यामध्ये शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांचा सहभाग नव्हता.

“…तर हीच खरी श्रद्धांजली ठरली असती” – (Shailesh Tilak)

“आम्ही आधीही भूमिका मांडली आहे. पक्षाने जर आमच्या घरात तिकिट दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण ते झालं असतं तर मुक्ता टिळक यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असती. मुक्ता टिळक यांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली असती. पण ठीक आहे पक्षाने विचार करून निर्णय घेतला असावा त्यामुळे आम्ही त्या निर्णयाला विरोध करत नाही. आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पक्षासोबत राहणार”, असं शैलेश टिळक यांनी म्हणाले आहेत.

“मुक्ता टिळक यांना जाऊन एक महिना झाला आहे. पण घडामोडी अत्यंत वेगाने झाल्या. आम्हाला यातून थोडं बाहेर यायला वेळ लागेल. आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही. आमची जी भूमिका होती ती पक्षाच्या नेत्यांना सांगितली आहे. आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही” असंही शैलेश टिळक यांनी सांगितलं आहे.

‘नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट’- Kunal Tilak

“सोशल मीडियावर आणि डिजिटल मीडियावर ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण भाजपने निर्णय घेतला आहे. त्याच निर्णयाचं आम्ही पालन करतो आहोत. ते प्रत्येकाने करायला पाहिजे. ‘नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट’ असा भाजपचा मंत्र आहे त्याचा विचार प्रत्येकानेच करायला पाहिजे. आम्हीही याच उद्देशाने पुढे जाऊ. भाजपने जो निर्णय घेतला त्याच्या पाठिशी आम्ही आहोत”, असे मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe