By Poll Election | कसबा पोटनिवडणुकीत ‘मविआ’चा उमेदवार ठरला; काँग्रेसने दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

By Poll Election | पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या निवडणुकीत आता तुफान राजकीय धुरळा उडणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हेमंत रासने यांच्याविरोधात महाविकास आघाडीनेही मोठा निर्णय घेत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरले आहेत.

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. उमदेवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर आजच हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नाना पटोलेंचं ट्वीट (Nana Patol’s Twit)

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“नाना पटोलेंचा कालच फोन” (Nana Patole called me yesterday and said that he has nominated me)

“मला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितलं. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे.

मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन (Rabindra Dhangekar salutes Mukta Tilak’s photo)

धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. यावेळी रोहित टिळकही उपस्थित होते. यावेळी धंगेकर यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घातला. मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. यावेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर होत्या. मी नगरसेवक असताना त्यांच्यासोबत काम केलं आहे. प्रत्येक निवडणुकीत केसरीवाड्यात येऊन मी टिळकांचं दर्शन घेत असतो. त्याप्रमाणे आजही आलो आहे’, असंही रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-