BJP | जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राज्यात भाजप पदाधिकाऱ्याची घोषणेची चर्चा

BJP | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘अफजलखान आणि शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत’, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं.  त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांच्या प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहनही करण्यात आले. आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेले असतानाही आता जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्याविरोधात भाजपच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा आता भाजपकडून करण्यात आली आहे.

“दिसताच तोंडाला काळं फासा, जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस”

जालन्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल,” अशी घोषणा कपिल दहेकर यांनी केली आहे.  यापुढे जिथे कुठे जितेंद्र आव्हाड असतील त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशाराही कपिल दहेकर यांनी दिला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्यावरून माघार नाही”

“काहीही झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही. मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे” असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून यानंतर आंदोलन केली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केली आहेत.

“मी जे बोललो ते 2 हजार टक्के वादग्रस्त बोललो नाही. अफझलखान 1 लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. जिजाऊंनी महाराजांना सांगितलं माळरानावर अफझल खानाशी दोन हात करू नकोस. त्यानंतर विचार करून छत्रपती शिवरायांनी अफझल खानाच्या वकिलाला निरोप पाठवून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत अशी परिस्थिती निर्माण करून 5 जणांना हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. अफझल खान एवढा मोठा सरदार होता. आदिलशाहीतला त्याला धारातिर्थी पाडण्याचा पराक्रम शिवरायांनी केला. त्यामुळे ते अफझल खानापेक्षाही मोठे झाले”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“मी काहीही चुकीचं बोललो नाही”

“शाहिस्तेखान लाल महालात होता पण त्याला कळलं नाही शिवाजी महाराज कधी लाल महालात शिरले आणि बोटं छाटून गेले. औरंगजेब इतकी वर्षे दिल्लीत होता. महाराष्ट्रातली एक इंच जमीन त्याला घेता आली नाही. त्यामुळे महाराज श्रेष्ठ ठरले हेच तर मी बोललो. मी काहीही चुकीचं बोललो नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-