Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज

Chinchwad | पुणे : नुकत्याच झालेल्या पुण्यातील चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘रिंगसाईड रिसर्च’चा एक्झिट पोल समोर आला आहे .या पोलनुसार चिंचवड विधानसभेची जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक अनेक कारणांनी गाजली. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली.

भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाविषयी ‘रिंगसाईड रिसर्च’चा एक्झिट पोल समोर आला आहे.

रिंगसाईड रिसर्च : एक्झिट पोल : रिंगसाईड रिसर्च या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणातून चिंचवड विधानसभेची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

एकूण मतदान : 5,68,954

झालेले मतदान : 2,87,145 (50.47 %)

रिंगसाईड रिसर्च च्या सर्वेक्षणानुसार उमेदवाररनिहाय झालेल्या  मतदानाच्या टक्केवारीची विभागणी :

अश्विनी लक्ष्मण जगताप (BJP) : 45% – 47%

नाना काटे (NCP) : 31% – 33%

राहुल कलाटे (IND) : 18% – 20% इतर  : 2% – 4%

एकूण – 100%

भाजपचे विजयी मताधिक्य : 12% – 16%

(टीप सदर बातमी “रिंगसाईड रिसर्च”या जनमत चाचणी करणाऱ्या संस्थेच्या अंदाजावर आधारीत आहे.)

महत्वाच्या बातम्या-

Back to top button