Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrakant Khaire | गडचिरोली : राजकीय नेत्यांकडून निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करणे, संबंधित जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा करणं काही नविन नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावरुन ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

“ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात”

“महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणू, असा दावा भाजपचे दिग्गज नेते अमित शहा (Amit Shah) हे कोणत्या आधारावर करत आहेत. त्यांच्या या दाव्यामागे नक्की काहीतरी षडयंत्र आहे. देशात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात, त्यामुळेच ते एवढे खात्रीशीर दावे करू शकतात”, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पाहिजे”

“ईव्हीएम मशीन नको. बॅलेट पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. अमित शहा मोठ्या मोठ्या घोषणा करतात. 48 जागा महाराष्ट्रात जिंकू, 36 जागा बिहारमध्ये जिंकू. हे कोणत्या मुद्द्यावरून सांगता. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाइटद्वारे मॅन्युप्युलेट केलं जात आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन नको आम्हाला बॅलेट पेपरच हवा, अशी मागणी आमचे सर्व नेते करणार आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ही मागणी अधिक आक्रमकपणे केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे”, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

‘ठाकरेंची शिवगर्जना अभियानाला सुरवात’

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने राज्यभरात शिवगर्जना अभियानाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत ठाकरे गटाचे विविध कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे.

Chandrakant Khaire Criticize on CM Eknath Shinde

“महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटाने केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलं आहे. विकासाचं काम नाही. नोकऱ्या नाही. महागाई वाढली. एवढं असताना मिंधे गटानं स्ट्राँग केलं जातंय, हेच सांगायला आम्ही इथे आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी येथील एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. इथले फक्त ४ टाकून दिलेले नेते आहेत, तेच शिंदे गटात गेले. बाकीचे एकही महिला आघाडी किंवा युवासेनेतील नेते शिंदे गटात गेला नाही, हे अभिमानाने सांगावं वाटतं”, अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-