Sanjay Raut | “शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री”; संजय राऊतांचा विश्वास

Sanjay Raut | मुंबई : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकानाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या म्हणजेच पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले? (Sanjay Raut Comment on 40 MLA)

“जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, ते स्थिर किंवा वैध आहे हे कसं म्हणणार? त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. 40 चे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे आमचा आशेचा किरण आहे. भीती आहे म्हणूनच विस्तार होत नाही”, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

“कोणी नाव, धनुष्यबाण चोरलंय म्हणून रडत न बसता…”

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. ठाकरे गटाला विधीमंडळात कार्यालय नाहीये. त्याबाबतही संजय राऊत यांना विचारण्यात आलं. “अशा प्रसंगातूनच पुढे जायचं आहे. न्यायालयात लढाई सुरू आहे. कोणी नाव, धनुष्यबाण चोरलंय म्हणून रडत न बसता पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्याचं काम करत आहोत. सध्या शिवगर्जना हा उपक्रम सुरू आहे. काल वरळीत सभा झाली. हजारो लोक जमले. चिन्ह, नाव नसताना लोक जमत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या अटकेबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया

“मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कुणावरही राजकीय सूडाने कारवाई करायची नाही, असं आमचं धोरण होतं. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. त्यानुसार त्यांनी काम केलं आहे. नाही तर आम्ही संथगतीने तपास केले नसते”, असं राऊत म्हणाले आहेत.

“आयएनएस विक्रांत घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा होता. या प्रकरणात अटक करता आली असती. पण नव्या सरकारने अनेक प्रकरणं दडपून टाकली. क्लिनचीट दिली. हाच मोठा घोटाळा आहे. क्लिनचीट देणाऱ्यांविरोधात याचिका दाखल केली पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button