Share

हवामान विभागाचा महाअलर्ट; ताशी ९० किमी वेगाने येणारं वादळ अन् १७ राज्यांत हाहाकार; पुढचे ७२ तास…

हवामान विभागाने देशातील १७ राज्यांत ९० किमी वेगाच्या महावादळाचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने उच्चांक गाठला असून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

Published On: 

IMD Weather Alert: १७ राज्यांत महावादळाचा इशारा!

निसर्गाचा कोप कधी आणि कसा होईल, याचा काहीही नेम नाही! एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारी उष्णता, तर दुसऱ्या बाजूला आता विनाशकारी वादळाचं मोठं संकट देशावर घोंघावतंय.

भारतीय हवामान विभागाने (IMD) आज एक असा इशारा (IMD Weather Warning) दिलाय, ज्याने प्रशासनाची झोप उडवली आहे. २७ मे रोजी देशातल्या तब्बल १७ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह भयंकर वादळ धडकणार आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, या वादळाचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर इतका प्रचंड असेल.

IMD Weather Warning

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या चक्रीवादळाने १०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेला हा IMD Weather Alert अधिक गंभीर बनतो. आता पुढचे ७२ तास देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्रात उष्णतेचा कहर थांबायचं नाव घेत नाहीये. विदर्भात तर अक्षरशः आग ओकणारा सूर्य पाहायला मिळतोय. ब्रह्मपुरीमध्ये तापमानाने ४७.६ अंश सेल्सिअसचा खतरनाक उच्चांक गाठलाय. हवामान खात्याने वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ दिलाय. तर नागपूर, गडचिरोली आणि अकोल्यात ‘ऑरेंज अलर्ट’ आहे.

अकोल्यात पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने रस्ते सामसूम झालेत. गरम वाफांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नंदुरबारमध्ये तर या भयानक उकाड्याचा थेट फटका लहान मुलांना बसतोय. ताप, सर्दी, न्यूमोनिया आणि जुलाबाचे रुग्ण तिथे अचानक वाढलेत.

एवढं सगळं होत असतानाच, राज्यातल्या हवामानातही मोठा बदल दिसतोय. कोकण आणि मराठवाड्यात मात्र काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं टाळावं, असं स्पष्ट आवाहन प्रशासनाने केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install