Share

वर्ल्डकप गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; खेळाडू संतापली

Indian cricketer Pratika Rawal viral edited photos on social media.

Published On: 

Indian cricketer Pratika Rawal condemns viral edited photos on social media

🕒 1 min read

मुंबई – प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते, याचाच प्रत्यय आता भारताच्या एका वर्ल्डकप विजेत्या लेकीला आला आहे. मैदानात आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या प्रतिका रावल (Pratika Rawal) हिचा संयम आता सोशल मीडियावरील एका घाणेरड्या प्रकारामुळे सुटला आहे.

वर्ल्डकप २०२५ जिंकल्यानंतर प्रतिकाची लोकप्रियता शिखरावर आहे. पण याच लोकप्रियतेचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर तिचे एडिट आणि मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार लक्षात येताच प्रतिकाने आक्रमक पवित्रा घेतला. तिने थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Pratika Rawal Photos viral on social media

तिने थेट Grok ला टॅग करत लिहिलंय, “माझ्या कोणत्याही फोटोमध्ये एडिटिंग किंवा मॉडिफिकेशन करण्याची मी परवानगी देत नाही. मग ते जुने फोटो असोत किंवा नवीन. जर कोणी थर्ड पार्टी असे बदल करत असेल, तर ते तात्काळ थांबवा.” खेळाडूंच्या गोपनीयतेवर हा घाला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

एकीकडे हा मनस्ताप असला तरी दुसरीकडे प्रतिकाच्या कामगिरीचा यथोचित गौरवही होत आहे. वर्ल्डकपमध्ये ३०८ धावा काढून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या प्रतिकावर बक्षीसांचा वर्षाव झालाय.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी प्रतिकाला १.५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. इतकेच नाही तर, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) देखील तिला ५० लाख रुपये देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री आणि DDCA अध्यक्ष रोहन जेटली यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.

दुखापतीवर मात करत प्रतिकाने (Pratika Rawal) ज्या जिद्दीने वर्ल्डकपमध्ये बॅटिंग केली, ती खरोखरच कौतुकास्पद होती. आता मैदानाबाहेरच्या या ‘डिजिटल लढाईत’ सुद्धा ती तितक्याच ताकदीने उभी राहिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!