Share

IPL 2025 मध्ये मोठा निर्णय! दिग्वेश राठीचे थेट निलंबन, अभिषेक शर्माला दंड

Digvesh Rathi from LSG suspended for one IPL 2025 match after repeated Code of Conduct breaches. Abhishek Sharma fined 25% of his match fees.

Published On: 

Digvesh Rathi from LSG suspended for one IPL 2025 match after repeated Code of Conduct breaches. Abhishek Sharma fined 25% of his match fees.

क्रिकेट प्रतिनिधी | IPL 2025 स्पर्धेदरम्यान शिस्तभंगामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू दिग्वेश राठी याला पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी हैदराबादविरुद्ध एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोड ऑफ कंडक्टचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दिग्वेश राठीने यंदा तिसऱ्यांदा आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 गुन्हा केला असून, यापूर्वीही त्याच्याकडे पंजाब किंग्स (1 एप्रिल) व मुंबई इंडियन्स (4 एप्रिल) सामन्यांतील उल्लंघनांमुळे 3 डिमेरिट पॉईंट्स जमा होते. सोमवारीच्या प्रकारामुळे आणखी 2 डिमेरिट पॉईंट्स मिळाल्याने त्याच्या एकूण गुणांची संख्या 5 झाली आहे. आयपीएलच्या नियमांनुसार 5 डिमेरिट पॉईंट्स झाल्यावर एका सामन्याचे निलंबन दिले जाते. परिणामी, दिग्वेश राठी 22 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये होणारा सामना खेळू शकणार नाही.

IPL 2025: Digvesh Rathi suspended, Abhishek Sharma fined

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा याच्यावर सुद्धा लेव्हल 1 गुन्ह्याबद्दल (कलम 2.6) 25 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्यावर हा पहिला डिमेरिट पॉईंट नोंदवण्यात आला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 उल्लंघनांबाबत सामना पंचांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही