Share

Dhangar Reservation | धनगर समाज आक्रमक; आरक्षणासाठी बारामती बंदची हाक

🕒 1 min readDhangar Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करत असताना धनगर समाज देखील आरक्षणावरून आक्रमक झाला आहे. धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेना पेटून उठली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून यशवंत सेना आजपासून अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमरण उपोषण करणार आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणासाठी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Dhangar Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करत असताना धनगर समाज देखील आरक्षणावरून आक्रमक झाला आहे.

धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेना पेटून उठली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून यशवंत सेना आजपासून अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमरण उपोषण करणार आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणासाठी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.

Chandrakant Waghmodeya started a hunger strike for Dhangar reservation

राज्य सरकारने 50 दिवसानंतरही धनगर आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) निर्णय न घेतल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे.

यासाठी यशवंत सेना आजपासून चौंडीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) बारामतीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे या युवकाने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.

बारामतीकरांनी चंद्रकांत वाघमोडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीवर सरकार दुर्लक्ष करत असल्याचं धनगर आंदोलकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनगर समाजासह (Dhangar Reservation) मराठा समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटून उठला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईमध्ये जाऊ आणि आम्ही आमच्या न्यायासाठी लढू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!