Share

Maratha Reservation | मराठा आंदोलन भडकलं; दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसफेऱ्या रद्द

🕒 1 min read Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे. अशात राज्यात बहुतांश ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची दिसून आली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी बसेस देखील फोडण्यात आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी एसटी बस … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे.

अशात राज्यात बहुतांश ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची दिसून आली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी बसेस देखील फोडण्यात आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे.

ST bus service stopped from Ratnagiri over Maratha reservation

राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून बस बंद केल्याची माहिती रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातून बेळगाव, लातूर, पुणे, बीड, कोल्हापूर इत्यादी भागांमध्ये जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्या आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या बस बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. अचानक एसटी बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

अचानक बस बंद केल्यामुळे अनेक प्रवासी खाजगी वाहनांनी प्रवास करत आहे. तर अनेक प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) लवकर आरक्षण दिलं नाही, तर मराठा समाजाचं आंदोलन असंच पेटत राहणार असल्याचं बोललं जात आहे.

Today is the eighth day of Manoj Jarange’s hunger strike

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation), यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे.

त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाज गावागावात उपोषण आणि आंदोलन करत आहे.

तर बहुतांश ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक होताना दिसत आहे. त्यामुळं राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही