Share

Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या वक्तव्याला कवडीची किंमत नसते – संजय शिरसाट

🕒 1 min readSanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रामध्ये एनडीए राहणार नाही. एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रामध्ये होणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांना भविष्य सांगायची … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रामध्ये एनडीए राहणार नाही. एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रामध्ये होणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

संजय राऊत यांच्या या वक्तव्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांना भविष्य सांगायची सवय लागली आहे. त्याचबरोबर राऊतांच्या वक्तव्याला काडीची किंमत नसते, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut has a habit of predicting the future – Sanjay Shirsat

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत यांना भविष्य सांगायची सवय लागली आहे. सरकार एक महिन्यात कोसळेल, दोन महिन्यात कोसळेल असं ते आधी म्हणायचे. मात्र, तसं काही झालं नाही. म्हणून आज ते सरकारबद्दल बोलत नाही.

त्याचबरोबर संजय राऊत जे काय प्रतिक्रिया देतात त्याला कवडीची किंमत नसते. दररोज सकाळी दहा वाजता वाजायला राज्यपाल काही संजय राऊतांसारखा भोंगा नाही.

राज्यपाल हे राज्यपाल आहेत. ते एक घटनात्मक पद आहे. राज्यपालांना रोज प्रेस घेऊन तुमच्यासारखी बडबड करायची गरज नाही. राज्यपाल शांतपणे त्यांची सर्व कामं करत आहेत.”

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदारांना ‘सडके आंबे’ म्हणतं त्यांच्यावर खोचक टीका केली होती. यावर बोलताना शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सडके आंबे म्हटलं आहे.

याचा अर्थ असा की त्यांनी आमचा सडेपर्यंत वापर करून घेतला आहे. आमच्यातली कलागुण आता त्यांना कळायला लागले आहे. आम्ही संघटना मजबूत करण्यासाठी उपयुक्त होतो हे आता त्यांना कळून चुकलं आहे.

परंतु आता आमच्यावर आरोप प्रत्यारोप करायचा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव झाला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे सतत टोमणे मारत असतात.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला जावं असं विरोधक सतत म्हणत आहेत. यावर भाष्य करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “कुणी कुठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना मणिपूरबद्दल अधिक सहानुभूती वाटत असेल त्यांनी त्या ठिकाणी जावं.

तुम्हाला त्या ठिकाणी जायला कुणी अडवलेलं नाही. घरात बसून इतरांवर टीका करणं सोपं आहे. मात्र, प्रत्यक्षात जाऊन काम करणं अवघड असतं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!