Share

Job Alert | नोकरीची संधी! केंद्र सरकारच्या ‘या’ सुरक्षा दलात लवकरच होणार भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! कारण भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) लवकरच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. औद्योगिक सुरक्षा दलात सुरू होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! कारण भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) लवकरच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. औद्योगिक सुरक्षा दलात सुरू होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार www.cisf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या एकूण 451 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर इत्यादी पदांच्या 451 रिक्त जागा आहेत. या पदासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील या भरती प्रक्रियेसाठी वय वर्ष 21 ते वय वर्ष 27 पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ग्रहण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 23 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार www.cisf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही