Share

Aaditya Thackeray | “स्वतःचे खोके, दुसऱ्यांना धोके”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

🕒 1 min read Aaditya Thackeray | मुंबई : ठाण्यातील घोडबंदर भागात शनिवारी ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. “राजकीय कार्यक्रम, मेळावे होत असतात. ज्या व्यक्तिला आम्ही पुढे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Aaditya Thackeray | मुंबई : ठाण्यातील घोडबंदर भागात शनिवारी ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

“राजकीय कार्यक्रम, मेळावे होत असतात. ज्या व्यक्तिला आम्ही पुढे आणले. त्या एका गद्दाराने राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले, याची लाज वाटते. असे आदित्य म्हणाले. मागील सहा महिन्यांत जिथे कुठे कार्यक्रम असतात. तिथे एकच कॅसेट त्यांच्याकडून वाजत असते”, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात घडत असताना शिवसेनेत नवे चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. सुकलेली पाने गळून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील अल्पआयुचे आणि खोके सरकार दोन ते तीन महिन्यात कोसळणारच”, अशी टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

“महाराष्ट्रात मोघलांचं सरकार आहे, असं दिसत आहे. स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके, असं सुरू आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी दुःखी आहेत. सरकारकडून जनतेसाठी एक पाऊल पुढं असं कुठंही दिसत नाही”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही