Garlic | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लसणाच्या ‘या’ पद्धतीने करा वापर

Garlic | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक तत्त्वांच्या अभावामुळे केस गळतीची समस्या खूप सामान्य झाली आहे. त्यामुळे केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. कारण प्रत्येकालाच दाट, मजबूत आणि चमकदार केस हवे असतात. यासाठी तुम्ही लसणाचा उपयोग करू शकतात. होय! लसणाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. कारण लसणामध्ये आढळणारे गुणधर्म केस वाढवण्यास मदत करू शकतात. केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने लसणाचा वापर करू शकतात.

मध आणि लसूण (Honey and Garlic-For Hair Care)

लसूण आणि मधाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला मिळू शकते. यासाठी तुम्हाला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यामध्ये एक चमचा मध मिसळून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. तयार झालेली ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावी लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस शाम्पूने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.

कांदा आणि लसूण (Onion and Garlic-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी कांदा आणि लसूण उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन कप पाण्यात एक कांदा, चार लवंग, दालचिनीचा तुकडा आणि दोन लसणाच्या पाकळ्या मिसळून उकळून घ्यावा लागेल. हे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला ते केसांना साधारण वीस मिनिटे लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात.

आले आणि लसूण (Ginger and Garlic-For Hair Care)

केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी लसूण आणि आल्याची पेस्ट मदत करू शकते. त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यांमध्ये एक छोटा आल्याचा तुकडा मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर या मिश्रणामध्ये तुम्हाला दोन चमचे गरम तेल मिसळावे लागेल. या तेलाने केसांना मसाज केल्याने केसांच्या समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर या तेलाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खाली गोष्टींचा समावेश करू शकतात.

कढीपत्ता (Curry leaves-For Hair Care)

कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कढीपत्त्यामध्ये आढळणारे गुणधर्म केस तुटणे, केस गळणे, केसांचे अनियमित पांढरे होणे या समस्यांपासून सुटका करतात. केसांच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करू शकतात. नियमित कढीपत्त्याचे सेवन केल्याने केस दाट आणि मजबूत होऊ शकतात.

शेंगदाणे (Peanuts-For Hair Care)

शेंगदाण्याचे सेवन करणे आरोग्यासोबतच केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शेंगदाण्यामध्ये आढळणारे पोषक घटक केस गळती, केस तुटणे यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यासाठी तुम्ही शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी त्याचे रिकाम्या पोटी सेवन करू शकतात. नियमित भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button