Dark Spots | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Spots | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून (Skin Care) ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येकाला स्वच्छ, चमकदार आणि डागमुक्त त्वचा हवी असते. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी उत्पादन वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेतात. मात्र, या सर्व गोष्टी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकतात. कांद्यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील डाग सहज दूर करू शकतात. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही कांद्याचा खालील पद्धतीने वापर करू शकतात

कांद्याचा रस (Onion juice-Dark Spots)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कांदा किसून त्याचा रस काढून घ्यावा लागेल. त्यानंतर साधारण वीस मिनिटं तुम्हाला कांद्याचा रस चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कांद्याचा रस त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करतो. त्यामुळे कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

कांदा आणि लसूण (Onion and garlic-Dark Spots)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही कांदा लसणाच्या पेस्टचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक कांदा आणि एक पाकळी लसूण बारीक करून मिक्स करून घ्यावा लागेल. त्यानंतर ही पेस्ट तुम्हाला डाग असलेल्या भागावर वीस मिनिटे लावून ठेवावी लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

कांदा, हळद आणि कोरफड (Onion, Turmeric and Aloe Vera-Dark Spots)

कांदा, हळद आणि कोरफड मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे कांद्याच्या पेस्टमध्ये एक चमचा एलोवेरा जेल आणि चिमूटभर हळद मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या फेसपॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील फळांचा समावेश करू शकतात.

सफरचंद (Apple-For Hair Fall)

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंदाचे नियमित सेवन करणे आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 12 आढळून येते, जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर आहारात सफरचंदाचा समावेश केल्याने केस गळतीवर नियंत्रण राहू शकते.

आवळा (Amla-For Hair Fall)

आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कोंडा, केस गळणे, केस कोरडे होणे इत्यादी समस्यांसाठी आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करू शकतात.

केळी (Banana-For Hair Fall)

केळीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि इतर पोषक घटक आढळून येतात, जे केस गळतीच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. दररोज दोन ते तीन केळीचे सेवन केल्याने केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button