Hair Fall | केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Hair Fall | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि मजबूत केस हवे असतात. मात्र, अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांच्या समस्या वाढत जातात. त्याचबरोबर वाढते प्रदूषण, धूळ, माती यामुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यावर बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रासायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील फळांचा समावेश करू शकतात.

सफरचंद (Apple-For Hair Fall)

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंदाचे नियमित सेवन करणे आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 12 आढळून येते, जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर आहारात सफरचंदाचा समावेश केल्याने केस गळतीवर नियंत्रण राहू शकते.

आवळा (Amla-For Hair Fall)

आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कोंडा, केस गळणे, केस कोरडे होणे इत्यादी समस्यांसाठी आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करू शकतात.

केळी (Banana-For Hair Fall)

केळीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि इतर पोषक घटक आढळून येतात, जे केस गळतीच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. दररोज दोन ते तीन केळीचे सेवन केल्याने केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील फळांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर अक्रोडाचे दररोज सेवन केल्याने त्वचेला खालील फायदे मिळू शकतात.

रक्त शुद्ध राहते (The blood remains pure-Walnut For Skin)

अक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात अंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि शरीरातील फ्री रॅडिकल्स मुक्त करतात. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. परिणामी त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

त्वचा मॉइश्चराईज राहते (Skin stays moisturized-Walnut For Skin)

अक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 5 आणि विटामिन ई आढळून येते, जे त्वचेला मॉइश्चराईज  ठेवण्यास मदत करते. नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला आतून पोषण मिळते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या