Share

Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सभागृहामध्ये सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील घडामोडींवरुन टीका-टिपण्णी करण्यात आली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेले आरोप यांच्यापासून ते आदित्य ठाकरे यांचं लग्न यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीपर्यंत अशा अनेक विषयांनी सभागृहात रंगत आली होती. त्यातच विधानभवन परिसरातील आणखी एक घटना जास्त चर्चेत आहे.

भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आज सकाळी नेहमीच्या वेळेला विधानभवनात आले, मात्र विधान भवनात गेले नाहीत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर ते नतमस्तक झाले आणि माघारी फिरले. भास्कर जाधव नेमके कोणत्या कारणामुळे नाराज आहेत. त्यानंतर आपण आज सभागृहात का जाणार नाहीत, याचं कारणही त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं आहे.

“आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही” | Bhaskar Jadhav is upset

“आज मी सभागृहातून बाहेर पडलोय. पुढचे 3 दिवस सभागृह सुरू राहणार आहे. पण उद्या गुढी पाडव्याला आम्ही घरी निघालोय. पुढचे 3 दिवस मी सभागृहात येणारच नाही. येण्याची इच्छा नाहीये. मनात वेदना आहेत. भास्कर जाधव एकही दिवस चुकवत नाही. पण यावेळेला मला जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाहीये. विषय मांडू दिले जात नाहीयेत. मी नियमानं बोलण्याचा प्रयत्न करतोय”, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

‘I am deliberately not allowed to speak in the hall’

“हे अधिवेशन, कामकाज चालावं यासाठी मी नियमात राहून लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती लावली जात नाहीये. त्यामुळे पुढील तीन दिवस मी सभागृहात येणार नाही. विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे, निसर्ग कोपाने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे हे अपेक्षा असते”, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

“माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. कोकणात खूप पाऊस पडतो व रस्ते खराब होतात. पण 1992-93 मध्ये एनरॉन कंपनीने रस्ते बांधले ते अजून जशास तसे आहेत. मग तसे रस्ते आज का बांधले जात नाहीत”, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सभागृहामध्ये सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील घडामोडींवरुन टीका-टिपण्णी करण्यात आली. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now