NCP Youth | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसवर या आधी बऱ्याचदा विरोधी पक्षांनी टीका-टिपण्ण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पक्ष म्हणून देखील बोललं गेलं. बारामतीच्या विकासावरुनही पवार घराण्यावर अनेकांनी ताशेरे ओढले. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाया करण्यात आल्या मात्र, आता याच राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला हेवा वाटावं अशी संधी एका तरुणाला दिली आहे.
सामान्य घरातील मुलाला राष्ट्रवादीने केलं ‘युवक सरचिटणीस’
भारताच्या राजकारणात राजकीय घराण्यांवरुन अनेकदा वाद पहायला मिळतो. मग ते ठाकरे घराणे असो किंवा पवार घराणे असो किंवा मग राष्ट्रीय पातळीवरील गांधी घराणं असो. घराणेशाहीवरुन अनेकदा वाद पहायला मिळतो. अनेकदा पवारांच्या घराणेशाहीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक टीका सहन केल्या आहेत. आता त्याच हडपसर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘सरचिटणीस’ पद देऊन टिकाकरांच्या कानशिलात लगावली आहे.
NCP made a boy from an ordinary house ‘Youth General Secretary’
सामान्य कुटुंबातील मुलगा सौरभ मिसाळ पाटील यांची हडपसर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘सरचिटणीस’ म्हणून निवड केली आहे. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले पाटील, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र अजित आबा घुले पाटील आणि सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर ईशान चेतन दादा तुपे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सौरभ मिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
“मी आजवर केलेल्या कामाची पावती म्हणून मला जी पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली ती मी योग्यरीत्या पार पाडेल असा मी विश्वास देतो. मला मार्गदर्शन देणारे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र अजित आबा घुले पाटील यांचे आभार”, असे म्हणत सौरभ मिसाळ यांनी वरिष्ठांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Deepak Kesarkar | राऊतांचं बोलण नेहमीच खालच्या पातळीचं असतं; केसरकरांची राऊतांवर जहरी टीका
- Ajit Pawar | “तुम्हाला बोलायचं ते बोला पण शरद पवारांचं नाव मधे घ्यायचं नाही”; अजित पवार आक्रमक
- Dada Bhuse | “राऊत ‘मातोश्री’ची भाकरी खातात अन् राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात”- दादा भुसे
- Prashant Kishor | “भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांनी ‘या’ तीन गोष्टी कराव्यात”; प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला
- Indian Post | भारतीय पोस्टात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू