Share

Indian Post | भारतीय पोस्टात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Post | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन पोस्ट, तामिळनाडू सर्कलमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. इंडियन पोस्ट (Indian Post) … Read more

Published On: 

Indian Post | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन पोस्ट, तामिळनाडू सर्कलमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इंडियन पोस्ट (Indian Post) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या एकूण 58 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Indian Post) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Post) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

द सीनियर मॅनेजर (जेएजी), मेल मोटर सर्व्हिस, क्र. 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006

जाहिरात पाहा (View ad)

https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_28022023_MMS_TN_Eng.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://indiapost.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही