Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी (National Water Development Agency) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
विविध पदांच्या 40 रिक्त जागा (40 vacancies of various posts)
नॅशनल वॉटर एजन्सी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 40 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १३ पदे, कनिष्ठ लेखाधिकारी (JAO) १ पद, ड्राफ्ट्समन ग्रेड III – ६ पदे, अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – ७ पदे, स्टेनोग्राफर ग्रेड – II – ९ पदे, निम्न विभाग लिपिक – ४ पदे भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 890 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागणार आहे.
अधिकृत वेबसाइट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Triphala Churna | रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा
- Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी
- Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”
- Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका