Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Rahul Gandhi | बंगळुरु : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भाषण केले होते. त्यांच्या या भाषणावरुन भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती. राहुल गांधींनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लंडनमधील वक्तव्य आणि अदानी प्रकरण याच दोन मुद्द्याचे पडसाद उमटत आहेत. या दरम्यान, राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेळगावमध्ये सभा घेतली आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Rahul Gandhi Comment on BJP, PM Narendra Modi And RSS

“कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. भाजप सरकार तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही, तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही प्रत्येक बेरोजगार पदवीधराला दरमहा 3000 रुपये आणि पदविकाधारकाला 1500 रुपये देऊ. आम्ही पुढील पाच वर्षांत कर्नाटकात 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे”, असे राहुल गांधीं म्हणाले आहेत.

“हा देश केवळ संघ, भाजप किंवा मोदींचा नाही” | “This country does not belong to Sangh, BJP or Modi alone”

“भाजप-आरएसएसवर टीका केल्याने देशाचा अपमान होत नाही. देशात करोडो लोक आहेत, हे भाजप-संघ विसरले. हा देश केवळ संघ, भाजप किंवा मोदींचा नाही. पंतप्रधान, भाजप किंवा संघावर हल्ला म्हणजे देशाचा अपमान होत नाही”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-