Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने खेडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही खेडमध्ये सभा घेतली होती. रविवारी संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.

रामदास कदम-भास्कर जाधव यांच्यात जुंपली

रामदास कदम यांच्या टीकेचा भास्कर जाधवांनी समाचार घेतला आहे. “कोकणात फार शिवराळ भाषा सभेत चालत नाही. कुणावर फार टीका-टिप्पणी करून खालच्या भाषेत बोललेलं आवडत नाही. काल रामदास कदमांचं भाषण सुरू झालं आणि सभेतून माणसं उठायला सुरुवात झाली. तेव्हा उठायला सुरुवात झालेली माणसं नंतर एकनाथ शिंदेंचं भाषण संपत आलं तरी उठून निघतच होती. रामदास कदमांना मी बामलाव्या म्हणत होतो. कोकणातला तात्या विंचू म्हणत होतो. कारण गेल्या 8 महिन्यांत रामदास कदम ज्या मुलाखती देत आहेत, त्याव्यतिरिक्त रामदास कदमांकडून काल एकही नवा मुद्दा मांडला गेला नाही”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले आहेत.

Bhaskar Jadhav Criticize Ramdas Kadam

“रामदास कदमांचा चेहरा जर खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समोर आणला, तर ही सगळ्या महाराष्ट्राची घोर चेष्टा असेल. ठाकरे घराण्यानं त्यांना मंत्री केलं म्हणून ते मंत्री झाले. खरं सांगायचं तर रामदास कदमांचा मंत्री म्हणून सभागृहात काय प्रभाव होता, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे रामदास कदमांना नवीन उपमा देण्याची गरज आहे. ती म्हणजे आमच्या कोकणातला जोकर”, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

“त्यांना नवीन उपमा देण्याची गरज म्हणजे आमच्या कोकणातला जोकर”

“रामदास कदम हे आमच्यासाठी खूप मोठे मॉडेल आहेत. रामदास कदम बोलले ती भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. मोदींचा मोठेपणा, अमित शाह यांचा मोठेपणा, 370 कलम, राम मंदिर हे सगळंच”, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले आहेत.

रामदास कदम काय म्हणाले?

“उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली? 2009 मध्ये तुम्ही मला गुहागरमधून तिकीट दिलं. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून तुम्ही मला पाडलंत. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या भास्कर जाधवची काय औकात होती मला पाडायची. असे 100 जाधव खिशात घेऊन फिरतो मी”, असं रामदास कदम कालच्या सभेत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button