Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केल्याचं पहायला मिळालं आहे.

“शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा”

“शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. अनेक ठिकाणी दगडासारख्या गारा पडल्या आहेत. यामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ सांगितले पाहिजे की पंचनामे करुन त्यावर सही करा. सही झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar is aggressive on the state government

“तुम्हाला हक्क, अधिकार मागण्या मागायचा आहे परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत. गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता आहे”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

“शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायचं?”

आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायचं? असा सवाल अजित पवारांनी राज्य सरकारला केला आहे. “राज्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. सरकार मात्र ठोस भूमिका घेत नाही. सरकारी कर्मचारी संपावर असल्यामुळं पंचनामे होत नाहीत असं राज्य सरकार सांगत आहे. पण राज्यात शासनाचे सगळे कार्यक्रम सुरु आहेत. त्या सर्व कार्यक्रमांना कर्मचारी हजर राहत आहे” काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-