Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही मंत्री दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. खडसेंनी विधानपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

एकानाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

“सरकार सातत्यानं सांगत आहे की मागच्या सरकारने हे केलं आणि आता आवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर आमच्या सरकारनं हे केलं. मागच्या सरकारमधील निम्मे मंत्री इकडे आहेत. त्यावेळी तुम्ही म्हणता त्यांनी चुका केल्या मग तुम्ही देखील त्याला जबाबदार आहे” असे खडसे म्हणाले आहेत.

Ekanath Khadse’s criticism of the state government

“मागील 15 दिवसांपासून राज्यात अवकामोठ्या प्रमाणात झालं आहे. अजुन मंत्री बांधावर गेले नाहीत. मग मंत्री आहेत तर कुठं? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. मी गुहाटीला चौकशी केली तर तिथं नाहीत असं कळलं मग गुजरातलां पण चौकशी केली तिथं देखील नसल्याचं सी आर पाटील यांनी सांगितलं. मग हे गेलेत कुठं?” असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे.

“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी”

“शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अजुनही पंचनामे नाहीत. मंत्री लक्ष देत नाहीत. आता तलाठी कामावर नाहीत. मग पंचनामे कोण करणार? नुकसान होऊन 15 दिवस झालं. पंचनाम्यासाठी अधिकारी गेले नसतील तर शेतकऱ्यांनी नुकसान झालेलं पीक तसेच ठेवायचं का? जर त्याने साफ केले तर हे परत म्हणतील की नुकसान झालं नाही. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी आमची मागणी आहे”, असंही खडसे म्हणाले आहेत.

“तुम्ही काय दिवे लागले” | Eknath Khadse Comment on State Government 

“शेतकऱ्यांचं हजारो कोटींचे कर्ज माफ करा. निरव मोदी सारखे लोकं पैसै बुडवून गेले मग तुम्ही इथं असलेल्या शेतकऱ्यांवर अनन्या करु नका. शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करा, खतांचे भाव कमी करा. कापसाला अजून अनुदान दिलेलं नाही ते तात्काळ द्या. मागच्या सरकारनं काय केलं ते जाऊ द्या तुम्ही काय दिवे लावले”, असंही एकनाथ खडसे विधान परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button