Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”

Devendra Fadnavis | नागपूर : राज्यात गेल्या ७ दिवासांपासून शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर होते. अखेर त्यांनी आज संप मागे घेतला आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. हा संप मागे घेतल्यानंतर उपमुख्यDevendra Fadnavis’s first reaction after the employees’ strikeमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर पत्रकारांशी बोलताना संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याची बातमी मला तुमच्याकडूनच समजली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता, तो आम्ही समजून घेतला आहे. यामध्ये आम्ही कुठेही अहंकार न ठेवता त्यांच्याशी संवाद साधला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“कर्मचाऱ्यांना जे सामाजिक संरक्षण हवं आहे. त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भात जे तत्व आहे, ते आम्ही मान्य केलं आहे. याची कार्यवाही कशी करायची, यासाठी एक समिती काम करत आहे. सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis’s first reaction after the employees called off the strike

“ही समिती तीन-चार ठरलेल्या मुद्द्यांवर अहवाल सादर करेल. त्या अहवालाच्या आधारावर आम्हाला पुढची कारवाई करता येईल. संवादातून तोडगा निघतो, असं आम्ही सातत्याने म्हणत होतो. आता संवाद झाला आहे. त्यामुळे मी कर्मचाऱ्यांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे, समितीने अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-