Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. अशात पुढचे तीन दिवस पुण्यासह परिसरात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसभर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.

येत्या तीन दिवसांमध्ये पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढवण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. सोमवारी (20 मार्च) पुणे शहरामध्ये 31 अंश सेल्सिअस कमाल आणि 16.3 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. सोमवारी पुणे शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची नोंद कुठे झाली नाही.

विदर्भामध्ये मंगळवारी (21 मार्च) अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर उर्वरित राज्यामध्ये हवामान कोरडे राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 31 ते 35 दरम्यान नोंदवण्यात आले आहे. तर किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे .

महत्वाच्या बातम्या