Ajit Pawar | “तुम्हाला बोलायचं ते बोला पण शरद पवारांचं नाव मधे घ्यायचं नाही”; अजित पवार आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याचे पडसाद विधानसभेत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे ‘मातोश्री’ची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) यांची चाकरी करतात, असं दादा भुसे म्हणाले आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.

दादा भुसे संजय राऊतांवर आक्रमक

“आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही”, असे दादा भुसे म्हणाले आहेत.

Ajit Pawar Aggressive on Dada Bhuse

“तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण शरद पवार यांचा उल्लेख केला, तो करायला हवा होता. दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडताना शरद पवार यांचा इथे उल्लेख करणं योग्य नाही. मोदी साहेबही पवार साहेब यांच्या संदर्भात काय बोलतात हे आपल्याला माहित आहे. दादा भुसे तुम्ही तात्काळ माफी मागा. दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते सर्व प्रसारमाध्यमांमध्ये गेलेलं आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“दादा भुसे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”

“प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भुसेंनी त्यांची भूमिका मांडत असताना आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचं काडीचंही कारण नव्हतं. शरद पवार 55 वर्षं समाजकारण-राजकारण करतात. नरेंद्र मोदींनीही शरद पवारांविषयी काय म्हटलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना दादाजी भुसे, तुमच्याकडून तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाहीतर आम्हाला वॉकआऊट करावं लागेल”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

संजय राऊतांचा दादा भुसेंवर गंभीर आरोप

“शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल”, असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.