Prashant Kishor | “भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांनी ‘या’ तीन गोष्टी कराव्यात”; प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला

Prashant Kishor | नवी दिल्ली : भाजपविरोधात देशातील सर्व विरोध पक्ष एकवटले आहेत. त्यातच आता राजतीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सर्व पक्षांना सल्ला दिला आहे. भाजपला हारवणं कधी शक्य होईल हेच त्यांनी आता सांगितलं आहे. “भाजपच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले तरीही फक्त तेवढंच उपयोगाचं नाही. एवढंच काय राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळेही फारसा काही फायदा निवडणुकीच्या दृष्टीने होईल असं वाटत नाही” असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांनी NDTV ला मुलाखत दिली आहे.

Prashant Kishor’s advice to BJP opposition parties

“विरोधी पक्षांची एकजूट हा फक्त एक देखावा आहे. फक्त नेते एकत्र आल्याने भाजपला हारवणं शक्य नाही. भाजपला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला भाजपची ताकद, त्यांची बलस्थानं काय आहेत? याचाच अर्थ हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजायला हवा. भाजपला आव्हान द्यायचं असेल तर कुठल्याही विरोधकाला या तीन गोष्टी विचारात घेऊन त्यांना आव्हान द्यावं लागेल”, असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

“हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक

“हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक आहे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा महत्त्वाच्या आहेत. मात्र या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाही. त्या विचारधारा भाजपच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागेल”, असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

“मी सध्या पाहतोय विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय कुणी कुणासोबत चहा घेतंय. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडेल. कारण एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपला हरवण्याची पद्धत नाही”, असेही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

“बिहारचं राजकारण हे अनेक चुकीच्या समजुतींसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जातीपातींमध्ये अडकलेलं आहे. आत्ता आम्ही असा प्रयत्न करत आहोत की इथे लोक काय करू शकतात? ते किती सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखला जाईल”, असे प्रशात किशोर बिहारबाबत बोलताना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.