Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य

Bacchu Kadu | मुंबई : राज्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनाचा शेटचा आठवडा आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णींची आतिषबाजी पहायला मिळाली. आजही विधानसभा सभागृहामध्ये टीकासत्र पहायला मिळालं. शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. मात्र, अनेक ठिकाणी हा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

“राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”

“आनंदाचा शिधा लोकांना नाही, तर आमदारांना खोक्यात मिळतो, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली होती. यावरून बच्चू कडू यांनी राऊतांना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊतांच्या स्वप्नात रोज खोके येतात. त्यांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणे गरजेचं आहे’, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

Bacchu Kadu Criticism Sanjay Raut

“राज्य कोणाचंही असलं तर गरिबांचं आयुष्य कडूच आहे. आपल्या देशात उपाशी झोपणारा आणि तुपाशी खाणारा, असे दोन वर्ग आहे. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी तुपाशी खाणाऱ्या लोकांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गरिबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार विरोधाकांना नाही. सत्तेच्या बाहेर आले की त्यांना उपाशी लोकांची आठवण येते आणि सत्तेत आल्यावर तुपाशी असलेल्या माणसांशी रोज भेटीगाठी होतात, त्यातला हा प्रकार आहे”, अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.