Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच दाट आणि मजबूत केस हवे असतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत असतात. यासाठी बहुतांश लोक विविध प्रकारचे तेल, शाम्पू आणि कंडिशनर वापरतात. मात्र, या गोष्टी केसांना दीर्घकाळ दाट आणि मजबूत ठेवू शकत नाही. केसांना मजबूत ठेवण्यासाठी त्यांना आतून पोषण देणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टींचे सेवन केल्याने केसांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.
कढीपत्ता (Curry leaves-For Hair Care)
कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कढीपत्त्यामध्ये आढळणारे गुणधर्म केस तुटणे, केस गळणे, केसांचे अनियमित पांढरे होणे या समस्यांपासून सुटका करतात. केसांच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करू शकतात. नियमित कढीपत्त्याचे सेवन केल्याने केस दाट आणि मजबूत होऊ शकतात.
शेंगदाणे (Peanuts-For Hair Care)
शेंगदाण्याचे सेवन करणे आरोग्यासोबतच केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शेंगदाण्यामध्ये आढळणारे पोषक घटक केस गळती, केस तुटणे यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यासाठी तुम्ही शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी त्याचे रिकाम्या पोटी सेवन करू शकतात. नियमित भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.
त्रिफळा (Triphala-For Hair Care)
त्रिफळा आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरू शकतो. केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी त्रिफळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. त्रिफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही दिवसातून एकदा त्रिफळाचे सेवन करू शकतात. त्रिफळाचे सेवन केल्याने केस दाट आणि मजबूत होऊ शकतात.
केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही वरील पदार्थांचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील फळांचा समावेश करू शकतात.
सफरचंद (Apple-For Hair Fall)
सफरचंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंदाचे नियमित सेवन करणे आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 12 आढळून येते, जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर आहारात सफरचंदाचा समावेश केल्याने केस गळतीवर नियंत्रण राहू शकते.
आवळा (Amla-For Hair Fall)
आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कोंडा, केस गळणे, केस कोरडे होणे इत्यादी समस्यांसाठी आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Dark Spots | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Hair Fall | केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज