Raj Thackeray | ‘राज ठाकरे भावी मुख्यमंत्री’, शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज वेगवेगळे ट्विस्ट घडत आहेत. काही दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील (Jayant Patil), तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव चर्चेत होते. आज गुढीपाडव्यादिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भाषणापूर्वीच शिवसेना भवनासमोर ‘भावी मुख्यमंत्री’ (Future Cm Of Maharashtra) अशी बॅनरबाजी करण्यात आली.

मुंबईतील शिवाजीपार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्या निमित्ताने सभा घेतली जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे सैनिकांना काय संबोधित करणार आणि विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

बॅनरमध्ये काय लिहलं? 

राज ठाकरे यांच्या मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनर उभारण्यात आले. या बॅनरवर महाराष्ट्राच्या ‘जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे’ असा आशय असलेला मजकुर छापण्यात आला आहे.

नेमकं बॅनर कुणी लावले?

मनसेकडून शिवसेना भवनासमोर दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले. राज ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेपूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. हे बॅनर शिवसेना भवनासमोरच का लावण्यात आले? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या