Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

Rupali Patil Thombare । आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात ( कसबा ) पोटनिवडणूक होत आहे. कसब्यात भाजपकडून (BJP) हेमंत रासने तर काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.  मतदान गुप्त पणे केलं जातं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पेजवर एक फोटो टाकला आहे. रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम (EVM) मशीनचा फोटो रुपाली पाटील यांनी फेसबुक पेजवर फोटो टाकला आहे. त्या फोटोनंतर विरोधकांनी त्यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. पोस्ट मध्ये लिहिले आहे की, शुभ सकाळ. कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा… असा उल्लेख त्यात आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोबत रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम (EVM) मशीनचा फोटो अपलोड केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मतदान गुप्त असताना रुपाली पाटील यांनी ते उघड केल्याचा आरोप केला आहे. त्यांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

या फोटो संदर्भात बाजू मांडताना रुपाली पाटील म्हणतात.. Rupali Patil on EVM Photo 

तो फोटो एका मतदाराने आपणास पाठवला. तो मी पेजवर टाकला. हा फोटो माझा नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मी अजून मतदानच केले नाही तर माझा फोटो कसा येणार? मी संध्याकाळी पाच वाजता मतदान करणार आहे. तोपर्यंत यंत्रणेने शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटलेय.

रुपाली पाटील यांनी फेसबुकवर टाकलेला फोटो ( Rupali Patil EVM Photo )

rupali patil and evm election photo kasba
rupali patil and evm election photo kasba

महत्वाच्या बातम्या-