#Big_Braking | कसबा पोटनिवडणुकीला नवं वळण: धंगेकरांची उमेदवारी रद्द करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

#Big_Braking | पुणे : पुण्यातील कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात 26 फेब्रुवारी म्हणजेच उद्या पोटनिवडणूकीचं मतदार होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषण मागे 

‘प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना हाताशी घेऊन कसब्यात पैसे वाटप केले’, असा आरोप धंगेकरांनी केला. याचा निषेध म्हणून रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण सुरू केलं. यानंतर पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं आहे. रवींद्र धंगेकरांनी केलेल्या उपोषणावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

धंगेकरांविरोधात भाजपचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात

भाजपचं शिष्टमंडळ रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालं आहे. या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

“आम्हाला बोगस मदतानाची शक्यता”-BJP

“आम्हाला बोगस मदतानाची शक्यता वाटते. वोटिंग कार्ड तिथे बोगस आहेत. त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होऊद्या, अशी आम्ही मागणी केली आहे”, अशी प्रतिक्रिया या शिष्टमंडळाने दिली आहे. ‘कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी’, अशी मागणी भाजपने केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.