Devendra Fadnavis | “पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची”; धंगेकरांच्या आरोपावरुन फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis | पुणे : पुण्यातील कसबा पेठेतील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात शनिवार सकाळी कसबा गणपती मंदीरासमोर रविंद्र धंगेकर हे पत्नीसोबत उपोषणाला बसले आहेत. धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“राजकीय स्टंट हे स्पष्टपणे लक्षात येतंय”

“राजकीय स्टंट आहे. सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही. हे माहीत असताना, अशाप्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते, त्यावेळी असे स्टंट केले जातात”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची” (Devendra Fadnavis Criticize On INC And NCP)

“खरं म्हणजे हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे. पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. भाजपची नाही आणि आमचा मतदारही असा नाही की पैसे घेऊन कुठे मतदान करेल. खरं म्हणजे एकप्रकारे मतदारांचा अवमान करण्याचं हे काम आहे. हे उपोषण भाजपच्या विरोधात नाही, हे मतदारांच्या विरोधात आहे कारण तुम्ही मतदारांना विकावू ठरवत आहात, हे अतिशय चुकीचं आहे. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

“माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी” (Ravindra Dhangekar’s serious allegation on BJP )

“पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपकडून लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल. भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे”, असा दावाही रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.