Sanjay Raut | “हिंमत खोक्यातून येत नसते, एकनाथ शिंदे हिंमत कुठून आणणार?”

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डिवचले आहे. गिरगावात छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओ “दैनिक सामनाची छायाचित्र काढणं हा नुसता छंद नाही तर ती हिंमत आहे. ही हिंमत खोक्यातून येत नसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही हिंमत कुठून आणणार?” असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“शिवसेना कधीच नष्ट होणार नाही”-Sanjay Raut

“शिवसेना काय आहे? हे समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन पाहावं. शिवसेना कायम शिखरावर राहील आणि आहे. सर्व काही येतं जातं. पण शिवसेना नेहमी टोकावर राहील. गिरगाव हा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. इथून शिवसेना कधीच नष्ट होणार नाही. गिरगावात मी येतो, त्या गिरगावातून शिवसेना कधी नष्ट होणार नाही. आपलं धनुष्यबाण चिन्ह, नाव गेलं तरी कार्यक्रमाला गर्दी उलट वाढली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“बाबरी आंदोलन सुरू असताना मुलायमसिंग यादवांची जांबोरी मैदानावर सभा होती. ही सभा शिवसेनेने उधळली होती. त्यावेळी खुर्च्या फेकल्या आणि त्यातील एक खुर्ची वरती उडाली. ती मुलायम सिंह यादव यांनी पाहिली आणि तो फोटो क्लिक झाला. ते मुलायम सिंह यादव यांनी लक्षात ठेवलं होतं. त्यांनी त्या फोटोच्या फोटोग्राफरचं कौतुक केलं होतं”, असा किस्सा राऊत यांनी यावेळी सांगितला.

“ईडीच्या कोठडीत कॅमेरे अँगल लावून उभे होते- Sanjay Raut

“ईडीच्या कोठडीत असताना मी ज्या खोलीत होतो. तिथल्या खिडकीवर सगळे कॅमेरे अँगल लावून तासनतास उभे होते. या फोटोत सगळं दिसंतय. आम्ही तरुण होतो. आता म्हातारे झालो तरी तरुण आहोत. प्रदर्शनात राजभवनातले मोर पाहायला या फोटोत मिळतंय”, असा चिमटा त्यांनी काढला.

Sanjay Raut criticize Bhagat Singh Koshyari

कोश्यारींना मोर पाहता आले नाही. त्यांचं लक्ष नव्हतं. त्याचा सगळं लक्ष आमच्याकडे होतं कोश्यारी राजभवनातील मोर बघत बसले असते तर सुखाने नांदले असते. राजभवनातील नाचणारे मोर कोश्यारींनी बघितले नाही. बघितले असते तर सुखाने नांदले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.