Share

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Published On: 

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे.

“आमचा विरोध फक्त नामांतराला”

“नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. आमचा विरोध फक्त नामांतराला आहे. आमचा ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांना विरोध नाही. भविष्यताही त्यांच्या नावाला विरोध करणार नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचाच आदर करतो. मात्र या महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केलेले नाही. ते राजकीय स्वार्थासासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करत आलेले आहेत”, असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

“भविष्यातही विरोध करत राहणार”

“आम्ही औरंगाबाद शहराच्या नामांतराला याआधीही नावाचा विरोध केला, भविष्यातही विरोध करत राहणार. कारण सरकारकडे लोकांना दाखवण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे ते पुढे आणतात. लोकांना भावनिक मुद्द्यांमध्ये कसे अडकवायचे, हे त्याचेच एक उदाहरण आहे,” अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली.

“आमची अवस्था ‘कही खुशी कही गम'”

“त्यांनी शहराचे नाव बदलले आहे. मात्र जिल्ह्याचे नाव अजूनही औरंगाबदच आहे. ते बदलता येत नाही. म्हणूनच आमची ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. सरकार त्यांचे आहे. उद्या ते कोणाचेही नाव बदलू शकतात. कारण त्यांच्याकडे सध्या ती ताकद आहे. मात्र संविधानाने मला अधिकार दिलेला आहे. सरकारने घेतलेला निर्णय मला पटत नसेल, तर त्याला मी विरोध करू शकतो. माझा तो अधिकार आहे. आणि मी विरोध करणार आहे,” असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

अंबादास दानवेंचा सवाल?

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलणार की फक्त ‘औरंगाबाद’ शहराचं नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही