Ramdas Kadam | “हा तर चिपळूनचा लांडगा”; भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Ramdas Kadam | खेड : शिवसेना फुटीनंतर राज्याच्या राजकाणात मोठा बदल झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान कलगितुरा रंगला. दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी करत ताशेरे ओढताना पहायला मिळतात. सध्याच्या राजकारणात राजकीय टीका करत असताना राजकारणाचा तोल ढासळल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अनेक नेते टीका करताना खालच्या पातळीची भाषा वापरत असतात. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात सध्या चांगलाच कलगितुरा रंगला आहे.

“रामदास कदम हा ‘झपाटलेला’ मधला तात्या विंचू”

“रामदास कदम हा ‘झपाटलेला’ सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो”, अशी टीका भास्कर जाधव यांनी रविवारी खेडच्या सभेत बोलताना केली होती. या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज खेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“भास्कर जाधव हा चिपळूनचा लांडगा”

“भास्कर जाधव हा चिपळूनचा लांडगा, हा बाडगा बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला आणि नंतर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आला. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा बाडगा आज रामदास कदम पेक्षा स्वत:ला निष्ठावान समजतो आहे. हा ‘एहेसान फरामोर्श’ आहे. त्याला निवडणुकीसाठी गाड्या मी पाठवल्या होत्या. १९९५ मध्ये मी बाळासाहेबांना सांगून तिकीट द्यायला लावली होती”, असं म्हणत रामदास कदमांनी भास्कर जाधवांचा राजकीय इतिहास सांगितला.

“पुढच्या निवडणुकीत तुला गाडल्याशिवाय राहणार नाही”

२००९ मध्ये उद्धव ठाकरेंनी माझ्या पराभवाची सुपारी दिली होती. त्यामुळे तू निवडून आला. पण आता गाठ माझ्याशी आहे, आता पुढच्या निवडणुकीत तुला गाडल्याशिवाय राहणार नाही”, असं प्रत्युत्तर रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-