Green Fruits | ‘या’ हिरव्या फळांचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात जबरदस्त फायदे

Green Fruits | टीम महाराष्ट्र देशा: हिरव्या फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर मानले जाते. हिरव्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हिरव्या फळांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर या फळांचे सेवन केल्याने पचनक्रिया देखील मजबूत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य तज्ञ देखील हिरवी फळ खाण्याचा सल्ला देतात. कारण हिरवी फळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. पुढील हिरवी फळ खाल्ल्याने आरोग्याला फायदे मिळू शकतात.

किवी (Kiwi-Green Fruits Benefits)

कीवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, विटामिन सी, पोटॅशियम, अँटिऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आरोग्य तज्ञ किवी खाण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील किवी खूप फायदेशीर ठरू शकते.

पेरू (Guava-Green Fruits Benefits)

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळून येते, जे स्नायू मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर पेरूचे सेवन केल्याने तणावही कमी होतो. पेरूमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळून येते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. या हिरव्या फळांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, झिंक, कॉपर यासारखे पोषक गुणधर्म आढळून येतात.

आवळा (Amla-Green Fruits Benefits)

आवळ्यामध्ये विटामिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, कार्बोहायड्रेट, फायबर इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. त्याचबरोबर आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारू शकते. मोसमी आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकतात.

वरील हिरव्या फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर डाळिंबाचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला खालील दुष्परिणाम बघावे लागू शकतात.

लो ब्लड प्रेशर (Low blood pressure-Pomegranate Side Effects)

लो ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी डाळिंबाचे सेवन करणे टाळले पाहिजे. डाळिंबाच्या थंड प्रभावामुळे शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग कमी होतो. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन टाळले पाहिजे. लो ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांसाठी डाळिंब घातक ठरू शकते.

खोकला (Cough-Pomegranate Side Effects)

जास्त प्रमाणात डाळिंब खाल्ल्याने खोकल्याची समस्या वाढू शकते. डाळिंबाचा प्रभाव खूप थंड असतो, त्यामुळे संसर्गही वाढण्याची शक्यता अधिक असते. सर्दी-खोकल्याची समस्या टाळण्यासाठी डाळिंबाचे नियंत्रणात सेवन केले पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या