Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महावितरण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 60 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये कायदेशीर सल्लागार आणि मुख्य कायदेशीर सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या जागांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 51
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1225lnCUFuFyK1ip70aoAQ-M8iv4vIHtP/view
https://drive.google.com/file/d/1225lnCUFuFyK1ip70aoAQ-M8iv4vIHtP/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Back Pain | मासिक पाळी दरम्यान पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो
- Job Opportunity | ‘या’ संस्थेमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- Kirit Somaiya | “लवकरात लवकर तुरुंगात जाण्याची तयारी करा”; सोमय्यांचा ‘हा’ गंभीर आरोप
- Jayant Patil | “भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून…”; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य