Jayant Patil | “भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून…”; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil | मुंबई : राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यातच नुकत्याच पुण्याच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याने कसब्याच्या भाजपच्या पराभवावरुन विरोधकांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. या पार्श्वभूमीवर बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना भाजपवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

“भाजप निवडणूक घ्यायला घाबरलं”

“आता भाजप निवडणूक घेण्यासाठी घाबरलेला आहे. महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Jayant Patil Criticize on BJP

“एकत्र लढलो तर फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश येईल. आकड्यात सांगता येणार नाही. मात्र मेजॉरिटी ही महाविकास आघाडीची असेल. भाजप निवडणूक घेण्यासाठी घाबरलेला आहे. कारण त्यांच्या लक्षात आले की शिंदे गटाबरोबर जी युती केली आहे ही महाराष्ट्राला रुचलेली नाही. त्यामुळे शक्यतो निवडणुका पुढे ढकलण्याचा काम चालू आहे”, या शब्दांत जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

Jayant Patil Criticize on State Government 

कांद्यांचा मुद्दा अधिवशेनामध्ये चांगलाच गाजत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. कांद्याला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. कांदा उत्पादकांना दर मिळत नसल्याने ते नाराज आहेत. कांदा उत्पादकांचे अतोनात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

“सरकारने थातूरमातूर उत्तरं दिली”

“कांद्याचे भाव पडले असून शेतकरी उघड्यावर पडला आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली. मात्र सरकारने थातूरमातूर उत्तरे दिली. सरकारने समिती नेमण्याचा आश्वासन दिले. समिती नेमेपर्यंत लहान शेतकरी कांदा विकेल. कारण त्याला पर्याय नसतो. हा कांदा व्यापाऱ्यांकडे जाईल. व्यापाऱ्यांचा हित संवर्धन करण्याचे काम भाजपचे सरकार करत आहे”, अशी  टीका जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.