Radhakrishna Vikhe Patil | “शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर : देशातील 3 राज्यांच्या आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती.

शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका नविन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना शरद पवारांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil Answered to Sharad Pawar  

“शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या कडेला पूर्वी जे पोपट बसत होते, त्यांची उपासमार तुम्ही का करता? भविष्य सांगणं त्यांचं काम आहे, ते काम त्यांना करू द्या. देशात सध्या कोणतेही बदलाचे वारे नाहीत आणि असा बदल करण्याची जनतेचीदेखील इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“भाजपला कसब्यात केवळ दोन ठिकाणी अधिक मतं मिळाली. नाही तर कसब्यात सरसकट मतं रवींद्र धंगेकरांना मिळाली आहेत. हा एक बदल आहे. आणि हा बदल पुण्यात होतोय. याचा अर्थ नागरिकांना बदल हवा आहे, यातून हे स्पष्ट होऊ लागलं आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होईल”, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

“मला स्वत:ला देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. पुण्याची निवडणूक काय सांगते, मागील पदवीधर निवडणुकीत जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली, तर एकही जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं आहे, सत्तेचा पूर्ण वापर त्यांच्याकडून होतो, हे या निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला. बदल होण्यास अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे”, असं शरद पवार बारामतीमध्ये बोलताना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button